गुरुवार, 5 जून 2014

इष्काची बाधा ..

















प्रेम असतं तरी काय
म्हटलं पाहावं एकदा करून ...
बुडूया प्रेमात आकंठ जरा
कुण्या प्रेमाच्या गावा जाऊन …

शेवटी शोध घेण्या प्रेमाचा
म्हणून घराबाहेर पडलो …
भलतं खूळ डोक्यात
म्हणून घरच्यांशीही नडलो …

फिरता फिरता असचं कुणी
नजरेत माझ्या पडली …
खरं सांगतो वाटलं मला
साताजन्माची भेट घडली ….

पाहिलं तिने मला अन
आमची झाली नजरानजर …
स्थळ काळ ठरलं जेव्हा
तिथे जातीने मी हजर …

कुणास ठावूक आज काल
फुलमंडईत मी जातो …
न चुकता तिच्या साठी
फुल गुलाबाचं नेतो …

काय माहित कसं काय
प्रीत आमची जुळली …
नशीब होतं बलवत्तर म्हणून
घरच्यांचीही पसंती पडली ...

स्मित होतं फुललं चेहऱ्यावरती
अन गालावर लाली …


कसं सांगू राव तुम्हाला

मलाही … …. इष्काची बाधा झाली … !!

…… …… …… …… बाधा इष्काची झाली … !!

3 टिप्‍पणियां:

  1. मनातले बोल ओठांवर
    कधी येतच नाही ...
    तुझ्या दुरावण्याची भीती
    उगीच मनी धासते...
    तू जवळ असतोस तेव्हा,
    बरेच काही बोलायचे असते...
    पण ते तसेच मनात राहते
    आणि वेडे मन स्वतःशीच हसते...।।😊


    Dip*

    जवाब देंहटाएं
  2. इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.

    जवाब देंहटाएं