ओढीने तुझ्या लागतसे, जेव्हा आस अपार
तगमग या जीवाची जीव बेचैनला फार
क्षणात कशी येते तुझी आठवणीची झुळूक
मार ग जरा फुंकर जगावेगळा आपला मुलुक … !!
तुझ्या इथे नसण्याचा विरह जरा जरा
चिंब जुन्या आठवणीत झुरव जरा जरा
थबकलाही क्षणभर तुझ्यात श्वास माझा जरा
नसण्यातही तुझ्या असण्याचा आभास जरा जरा … !!
जादू तुझ्या नयनांची अशी कि
पाहताना माझेच भान मज न रहावं
सावरून थोडं धरावी वाट परतीची
अन वळताना परत तू मला का पहावं ?
धुंद आठवणीत तिच्या ...पावसा... भिजव मला जरासं
बरसून चिंब सरींत या ... झुरवं मला जरासं
चिंब मन झालंय माझं धुंद बेधुंद
न्हाहुनी प्रीतसरींत माझ्या मिरवं जरा जरासं ... !!
बरसली सर नव्याने आता
फुलवून सृष्टीचे अणूरेणू
लालकाळ्या मातीवर
अंथरली हिरवी चादर जणू
फुल उमलावं तसं उमलते मैत्री
हाच मैत्रीचा फायदा आहे
हाच मैत्रीचा फायदा आहे
श्वास थांबला तरी नाही संपणार दोस्ती
हाच इथला काटेकोर कायदा आहे
हाच इथला काटेकोर कायदा आहे
आयुष्यात फार स्वप्न,
मी मनोमनी पाहिली,
वजाबाकी तर होतच गेली,
पण बेरीज करायची मात्र राहिली.
मी मनोमनी पाहिली,
वजाबाकी तर होतच गेली,
पण बेरीज करायची मात्र राहिली.
माझ्यातल्या तुझ्या अस्तित्वाला
पुसण्याचा फार प्रयत्न केला
पुसू तर नाही शकलो
पण माझ्या मनाचा तोल मात्र गेला.
श्रावणसरीत चिंब भिजुनी
सृष्टी नवा साज ल्याली
धारा त्या अवचित झेलुनी
रुक्ष मनास ……… , जणू नवी पालवी आली ... !!!
पापण्यात दडवलेल्या अश्रूंनी
माझी भलतीच पंचायत केली,
थांबवलेल्या अश्रूंना ,
मग मीच मोकळी वाट करून दिली.
स्वच्छंद प्रीतीत या,
जगण्याची रीतच न्यारी,
जणू सप्तरंगात न्हाऊन,
रंगमय झाली दुनिया ही सारी.
जगण्याची रीतच न्यारी,
जणू सप्तरंगात न्हाऊन,
रंगमय झाली दुनिया ही सारी.
सर सर करत आली श्रावणसर
आठवणींची मनामध्ये उमटुनी शीतलहर
आल्हादी नितळ थेंबाचा अवचितसा स्पर्श
चिंब भिजल्या मनाला झालाय आज हर्ष
आठवणीतलं रूप तुझं शब्दबद्ध करण्या
अनेक शब्द ग सये माझ्या मुखी येतात ..
मन वाहवत जातं आठवणीत तुझ्या
कळत नाही ... शब्दचं नकळत मग कधी मुके होतात .. !!
----------------------वैभव
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें