आली रे आली
गणरायाची सवारी
रूप देखणे - लोभस
गणरायाचे लईभारी ! !
कृपा गजराजाची
करी अविचाराचा नाश
दर्शने घडता श्रीचे
होई मनास हर्ष ! !
भेटीची रायाच्या मनी
लागलीसे आस
सत्संगाची नव्याने
धरुनी दृढ कास ! !
हेरंब गजनायक
लंबोदर विनायका
दुखात तूच तारक
सृष्टीचा विधाता ! !
विघ्नेशाच्या कृपेने
दुखाचा रंग लोपला
सुखाची माळ सांडूनी
गणराज रंगी नाचला ..
...... गणराज रंगी नाचला .. ! !
-- "वैभव"
गणरायाची सवारी
रूप देखणे - लोभस
गणरायाचे लईभारी ! !
कृपा गजराजाची
करी अविचाराचा नाश
दर्शने घडता श्रीचे
होई मनास हर्ष ! !
भेटीची रायाच्या मनी
लागलीसे आस
सत्संगाची नव्याने
धरुनी दृढ कास ! !
हेरंब गजनायक
लंबोदर विनायका
दुखात तूच तारक
सृष्टीचा विधाता ! !
विघ्नेशाच्या कृपेने
दुखाचा रंग लोपला
सुखाची माळ सांडूनी
गणराज रंगी नाचला ..
...... गणराज रंगी नाचला .. ! !
-- "वैभव"
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें